भीम स्मरण सकलं विज्जं विदुरञानं देवरूपं सुजिव्हं निमल चक्खु गभिर घोसं गौरवण्णं सुकायं ।। अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम | विरत रज्जं सुजननेतं भीमरावं सरामि | भीमरावं सरामि , भीमरावं सरामि ।। मराठी सर्वोत्तम विद्यासंपन्न , तीक्ष्ण बुद्धीसंपन्न , दिव्यरुप संपन्न , प्रभावशाली ध्वनी संपन्न , गौरवर्ण शरीर संपन्न , करुणा मैत्री संपन्न व निर्भयतेने धम्म कार्याला परिपूर्ण वाहून घेतलेले , जनसेवेसाठी मंत्रीपदाचा त्याग केलेले , जनतेचे श्रेष्ठ नेते , अशा सर्वगुण संपन्न परम पुज्य भीमरावांचे मी स्मरण करतो. भीम स्तुती दिव्य प्रभरत्न तूं , साधू वरदान तूं , आद्य कूल भूषं तू भीमराजा ।।१।। सकल विद्यापति , ज्ञान सत्संगति , शास्त्र शासनमति , बुद्धि तेजा || २ || पंकजा नरवरा , रत्त स्वजन उद्धारा , भगवंत आमुचा खरा , भक्तकाजा || ३ || चवदार संगरी , शास्त्र धरिता करी , कांपला अरि उरी , रौद्र रुपा ।।४।। मुक्ती पथ कोणता , जीर्ण स्मृती जाळीता , उजाळीला अगतिका , मार्ग साजा ।।५।। राष्ट्र घटना कृति , शोभते भारती , महामानव बोलती , सार्थ संज्ञा ।।६।। शरण बुद्धास । शरण धम्मास । शरण संघास मी भीमराजा ।।७।।...