बुद्ध पौर्णिमा उत्सवाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख सण आहे.हा सण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म , ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीन घटना झालेले आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वात महान महापुरुष होते , असे मानले जाते , आज बौद्ध धर्माला मानणारे प्रामुख्याने भारत , चीन , नेपाळ , सिंगापूर , व्हियेतनाम , थायलँड , जपान , कंबोडिया , मलेशिया , श्रीलंका , म्यानमार , इंडोनेशिया , पाकिस्तान इत्यादी देशातील 180 कोटीहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ आहे.गृहत्यागानंतर सिद्धार्थनी आणि सत्याच्या शोधासाठी सात वर्षे कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर एका बोधि वृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञान प्राप्ती झाली ही घटना वैशाखी पौर्णिमेला झाली.तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्...