बुद्ध जयंती किंवा बुद्ध पौर्णिमा हा बौद्ध धर्मीयांचा प्रमुख सण आहे.हा सण वैशाख पौर्णिमेच्या दिवशी जगभरात साजरा केला जातो. या दिवशी तथागत गौतम बुद्धांचा जन्म,ज्ञानप्राप्ती व महापरिनिर्वाण या तीन घटना झालेले आहेत आपल्या मानवतावादी आणि विज्ञानवादी बौद्ध धम्म सिद्धांतावरून तथागत बुद्ध विश्वातील सर्वात महान महापुरुष होते,असे मानले जाते, आज बौद्ध धर्माला मानणारे प्रामुख्याने भारत,चीन,नेपाळ,सिंगापूर,व्हियेतनाम,थायलँड,जपान,कंबोडिया,मलेशिया,श्रीलंका,म्यानमार,इंडोनेशिया,पाकिस्तान इत्यादी देशातील 180 कोटीहून अधिक लोक हा सण मोठ्या उत्साहात साजरा करतात. बिहारमधील बोधगया हे हिंदू व बौद्ध धर्मियांचे पवित्र तीर्थस्थळ आहे.गृहत्यागानंतर सिद्धार्थनी आणि सत्याच्या शोधासाठी सात वर्षे कठोर तपश्चर्या व साधना केली आणि त्यांना त्यानंतर एका बोधि वृक्षाखाली बुद्धत्व किंवा ज्ञान प्राप्ती झाली ही घटना वैशाखी पौर्णिमेला झाली.तेव्हापासून हा दिवस बुद्ध पौर्णिमा म्हणून ओळखला जातो. बुद्ध पौर्णिमेच्या वेळी कुशीनगर येथे महापरिनिर्वाण विहार या ठिकाणी एक महिना तथागत गौतम बुद्धांचे स्मरण केले जाते हे ठिकाण गौतम बुद्ध यांच्याशी संबंधित असले तरी आजूबाजूच्या परिसरातील हिंदू लोक देखील या ठिकाणाला मोठ्या संख्येने भेट देतात.येथील बुद्ध विहारात हिंदूही आस्थापूर्वक पूजा करण्यात येतात.या विहाराचे महत्त्व तथागत गौतम बुद्धाच्या महापरिनिर्वाणाशी जोडली गेली आहे या विहाराचे स्थापत्य अजिंठा लेण्यांच्या विहारा सारखी आहे. या विहारात गौतम बुद्धांची अंतिम क्षणाच्या मृत्यू शय्येवर पडलेल्या अवस्थेतील(भू स्पर्श मुद्रा) 6.1 मीटर लांब मूर्ती आहे. ही मूर्ती लाल माती पासुन बनवलेली आहे. जेथून मूर्तीसाठी माती काढली जाते तेथेच हे विहीर तयार केली आहे. विहाराच्या पूर्वभागातील एक स्तूप आहे तिथे गौतम बुद्धावर अंतिम संस्कार झाले. श्रीलंका तसेच अन्य दक्षिण-पूर्व आशियायी देशात हा दिवस वेसाक उत्सव म्हणून साजरा केला जातो. हा वैशाख शब्दाचा अपभ्रंश आहे. या दिवशी बौद्ध अनुयायी घरावर दिवे लावतात घरे फुलांनी सजवतात जगभरातून या दिवशी बुद्धगया येथे येतात आणि प्रार्थना करतात. या दिवशी बौद्ध परंपरेतील धार्मिक ग्रंथाचे वाचन, पठण केले जाते विहार तसेच घरातील बुद्धांच्या मूर्तीची फुले वाहून, दिवे ओवाळून पूजा केली जाते.बोधि वृक्षाची ही पूजा केली जाते आणि याच्या फांद्यांना पताक्यांनी सुशोभित केले जाते. वृक्षाच्या आसपास दिवे लावले जातात. झाडाच्या मुळाशी दूध आणि सुगंधी पाणी घातले जाते या दिवशी केलेल्या चांगल्या कामामुळे पुण्य मिळते अशी समजूत आहे.
बुद्ध पौर्णिमा उत्सवाचे स्वरूप आणि त्याचे महत्त्व
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know