Skip to main content

आस्तिक किंवा नास्तिक

आस्तिक किंवा नास्तिक 

आस्तिक आणि नास्तिक हा प्रत्येकाचा वैयक्तिक विषय आहे तरी डोळसपणे विचार पूर्वक सत्य काय आहे हे जाणून घ्या 1) माणूस सोडून एकही प्राणी देव मानत नाही 

2) जिथे माणूस पोहोचला तिथे मंदिर मस्जिद चर्च नाही सापडले

 3) वेगवेगळ्या भागात वेगवेगळ्या देवता आहेत याचाच  अर्थ माणसाला जसी  कल्पना सुचली तसा देव तयार झाला

 4) जगाचा अनेक  धर्म व पंथ व स्थानिक देवता  आहेत याचाच  अर्थ देव सुद्धा एक नाही 

5) सातत्याने नव नवीन देव तयार होत आहेत.

6) वेगवेगळ्या प्रार्थना आहेत  

7) मानला  जर देव नाहीतर दगड ही म्हण  उगीच नाही तयार झाली 

8)तीर्थ धोंडा पाणी देव रोकडा सज्जनी हे संत वचन...... 

9)जगातील देवतांचे वेग वेगळे आकार व त्याचा प्रसन्न होण्याचा वेगळ्या पूजा.....

10) आतापर्यंत ठाम पणे  मला देव भेटला असे कोणी सांगू शकत नाही आणि याचा प्रत्यक्ष पुरावाही देऊ शकला नाही 

11) देव मानणारा व न मानणारा ही  सारखेच  आयुष्य जगतो..  

12) देव  कुणाचेच  काहीही भले वा  वाकडे करू शकत नाही... 

13)देव कोणताही भ्रष्टाचार अन्याय अत्याचार चोरी बलात्कार आतंकवाद  अराजता रोखू शकत नाही. 

14)लहान निष्पाप बालकावर गोळया  घालण्याचे हात धरू शकत नाही. 

15) मंदिर, मठ आश्रम, शाळा प्रार्थना,  स्थळे व देवतांचे अस्तित्व ज्या ठिकाणी मानले जाते त्या ठिकाणीसुद्धा बालके स्त्रिया सुरक्षित सुरक्षित नाहीत. 

16) मंदिर मस्जिद  व  चर्च पाडताना देव एकदाही  एकदाही  आडवा आला नाही की बांधताना नगर पालिकेची परवानगी घेतली नाही.....

 17)अभ्यास न करता एकाही  देवाचे विद्यार्थ्यांनाला  पास केल्याची आठवत  नाही...

 18)केदारनाथ मध्ये एकाच वेळी दहा हजार लोक मेली  वर्षानुवर्षे मक्का मदिनेत चेंगराचेंगरी  हजारो हजारो लोक मेले एकलाही  त्यांनी वाचली नाही.    19)बऱ्याच देवाचा 25  वर्षापूर्वी मागमूसही नव्हता प्रख्यात देव झाले आहेत.. 

20)स्वतः भगवान म्हणून घेणारे सध्या जेलची हवा घेत आहेत का त्यांना भगवान बाहेर काढत नाहीत.  

21) जगात 250  कोटी लोक देवच मानत नाहीत तरी ते समाधानी व आनंदाने राहत आहेत..

 22)हिंदू अल्ला मानत नाही मुस्लिम देवाला मानत नाही ईसाई  देव व अल्ला  मानत नाही.. हिंदू-मुस्लीम गॉड  मानत नाहीत तरी कोणत्याही देवाने एकमेकांना विचारले नाही असे का? 

23) एक धर्म मानतो त्याला आकार नाही दुसरा त्या देवाला आकार देऊन फॅन्सी कपडे घालतो तिसरा वेगळच काहीतरी सांगतो नेमके चालायला तरी काय या देशात? 

24) देव आहे तर लोक धाक  का पडत नाहीत?

 25)समाजात घातक गोष्टी का करतात? 

26) जो मांसाहार करतो तोही जगतो,  नाही करत तोही  जगतो आणि जो दोन्हीही  खातो तो ही जगतो की...

27) निरपराधाची   हत्या होते स्त्रियांचे- मुलींची बलात्कार होतात तेव्हा देव कुठे असतात? 

28) आपल्याकडे 33  कोटी पेक्षा अधिक देव-देवता, अधिक महाराज अधिक अलाह  अधिक गॉड  संत-महंत यांचा अक्षरशः ऊत आला आहे. तरी पाऊस नाही. गरीब पासून मुक्ती नाही  शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी नाही,  बलात्कार कमी नाही रोगराई कमी नाही भ्रष्टाचार कमी नाही देवदेवतांच्या पूजा करण्यापेक्षा महापुरुषांचे विचार मनात रुजवली पाहिजे या  सर्व बाबी वरून  लक्षात येते की माणसाला देवाचा धाक नाही आपले संस्कार रूढी-परंपरा या गोष्टींचा आपल्या मनावर एवढा पगडा पडला आहे की यातून बाहेर पडण्याची आपली मानसिकता व संवेदना बधीर झाली आहे कारण देवाचा निर्माता मानव आहे या बाबच  तो  लक्षात घेत नाही बिच्चारी देव तरी काय करणार?  यावर उपाय एकच प्रयत्नवादी बनणे  विज्ञानवादी बनणे  सत्य वर विश्वास  ठेवणे...

Comments

Advertisement

Popular posts from this blog

Bhim Smaran, Bhim Stuti / भीम स्मरण , भीम स्तुति

भीम स्मरण सकलं विज्जं विदुरञानं देवरूपं सुजिव्हं निमल चक्खु गभिर घोसं गौरवण्णं सुकायं ।। अभय चित्तं निभय कामं सुरत धम्मं सुपेम | विरत रज्जं सुजननेतं भीमरावं सरामि | भीमरावं सरामि , भीमरावं सरामि ।। मराठी सर्वोत्तम विद्यासंपन्न , तीक्ष्ण बुद्धीसंपन्न , दिव्यरुप संपन्न , प्रभावशाली ध्वनी संपन्न , गौरवर्ण शरीर संपन्न , करुणा मैत्री संपन्न व निर्भयतेने धम्म कार्याला परिपूर्ण वाहून घेतलेले , जनसेवेसाठी मंत्रीपदाचा त्याग केलेले , जनतेचे श्रेष्ठ नेते , अशा सर्वगुण संपन्न परम पुज्य भीमरावांचे मी स्मरण करतो.   भीम स्तुती दिव्य प्रभरत्न तूं , साधू वरदान तूं , आद्य कूल भूषं तू भीमराजा ।।१।। सकल विद्यापति , ज्ञान सत्संगति , शास्त्र शासनमति , बुद्धि तेजा || २ || पंकजा नरवरा , रत्त स्वजन उद्धारा , भगवंत आमुचा खरा , भक्तकाजा || ३ || चवदार संगरी , शास्त्र धरिता करी , कांपला अरि उरी , रौद्र रुपा ।।४।। मुक्ती पथ कोणता , जीर्ण स्मृती जाळीता , उजाळीला अगतिका , मार्ग साजा ।।५।। राष्ट्र घटना कृति , शोभते भारती , महामानव बोलती , सार्थ संज्ञा ।।६।। शरण बुद्धास । शरण धम्मास । शरण संघास मी भीमराजा ।।७।।...

Punyanumodan/ पुण्यानुमोदन

पुण्यानुमोदन दुक्खपत्ताच निदुक्खा भयपत्ताच निब्भया । सोकपत्ताच निसोक्का होन्तु सब्बेपि पाणि नो ।।१।। एतावताच अम्हे हि सम्भतं पुञञ सम्पदं । सब्बे देवानु मोदन्तु सब्ब सम्पति सिद्धिया ।।२।। दानं ददन्तु सद्धाय सीलं रक्खन्तु सब्बदा   | भावना भिरता होन्तु गच्छन्तु देवतांगता   || ३ || सब्बे बुद्धा बल पत्ता पच्चे कानञ्च यं बलं । अरहन्तानञ्च तेजेन रक्खं बन्धामि सब्बेसो   || ४ || आकासठ्ठा च भुम्मट्ठा देवा नागा महिंद्धिका   | पुत्र्त्रंतं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु सासनं ।।५।। आकासठ्ठा च भुम्मठ्ठा   देवा नागा महिंद्धिका । पुत्र्त्रंतं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु देसनं ।।६।। आकासठ्ठा च भुम्मट्ठा देवा नागा महिंद्धिका   | पुत्र्त्रंतं अनुमोदित्वा चिरं रक्खन्तु त्वं परन्ति ।।७।।  

Bouddha Sanskar Vidhi Kram / बौद्ध संस्कार विधींचे क्रम

  बौद्ध संस्कार विधींचे क्रम १) धम्मदीक्षा : १) २२ प्रतिज्ञा २) त्रिसरण ३)  पंचशील  ४) आशिर्वाद ५) सरणतय २) नामकरण : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) बुद्ध वंदना ७) धम्म वंदना ८) संघ वंदना ९) परित्राण पाठ १०) करणीयसुत्त ११) सब्बसुख गाथा १२) धम्मपालन गाथा १३) आशिर्वाद १४) सरणतय ३) वाढदिवस : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४)भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) बुद्ध वंदना ७) धम्म वंदना ८) संघ वंदना ९) परित्राण पाठ १०) संकल्प ११)आशिर्वाद १२) सरणतय ४) विद्यारंभ : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) बुद्ध वंदना ७) धम्म वंदना ८) संघ वंदना ९) परित्राण पाठ१०) महामङगल सुत्त ११) सब्बसुख गाथा १२) धम्मपालन गाथा १३) आशिर्वाद १४) सरणतय ५) साक्षगंध : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) परित्राण पाठ ७) महामङगल गाथा ८) सब्बसुख गाथा ९) धम्मपालन गाथा १०) आशिर्वाद ११) सरणतय. ६) विवाह : १) त्रिसरण २) पंचशील ३) बुद्ध पुजा ४) भीम स्मरण ५) भीम स्तुती ६) प...