*भगवंत म्हणाले, " माणसाने दृष्ट मनोविकारांवर जर ताबा ठेवला नाही, तर लवकरच हे*
*दृष्ट मनोविकार त्याचा ताबा घेतील आणि मनुष्य दृष्ट मनोविकारांचा केवळ गुलाम बनेल.*
*मग माणसात आणि जनावरात काहीच फरक राहणार नाही. कारण मनुष्य आणि जनावरे*
*दोघेही खातात , झोपतात आणि आपली लैंगिक भूक भागवितात . परंतु माणसाप्रमाणे*
*पशु आपली आध्यात्मिक प्रगती करू शकत नाहीत. माणसाने जर आपल्या दृष्ट प्रवृत्तींना*
*नष्ट केले आणि कुशल प्रवृत्तींना जपले तर त्याचा इतका विकास होऊ शकतो कि, तो स्वतः*
*बुद्ध बनू शकतो . म्हणून भगवान बुद्ध नेहमी आपल्या शिष्यांना जागृत राहून, दृष्ट प्रवृत्तींना काबूत ठेवून , सत्प्रवृत्तींना विकसित करण्याचा सल्ला देत असतात .*
*" उठा जागे व्हा , निश्चयाने शांतीचा अभ्यास करा. तुम्हांस बेसावध झालेले पाहून मार तुम्हांस मोह न पडो."*
*भगवंत म्हणतात...*
*उठ्ठानकालाम्ही अनुटठहानो , युवा बलीआल सियं उपेतो !*
*संसन्नसंकप्पमनो कुसी तो , पञञाय मंग्गअलसो विन्दती !!*
*तरुण आणि शक्तिशाली असून देखील आळसामुळे जो मनुष्य पुरुषार्थ ( प्रयत्न ) करण्याच्या वेळी पुरुषार्थ करीत नाही व ज्याची संकल्प शक्ती व इच्छा शक्ती ( मन ) खचलेली आहे*
*त्या आळशी माणसाला प्रज्ञेचा , ज्ञानाचा मार्ग सापडत ( जडत ) नाही.*
*नमो बुद्धाय*
Comments
Post a Comment
if you have any doubts plesase let me know