*#हे_क्षण_ही_निघून_जातील !* एका राजाला जीवनाविषयी अपार कुतूहल होते. त्याच्या दरबारात येणाऱ्या प्रत्येक साधू , संत, फकिराला तो विचारत असे की मला एक असा छोटा मंत्र द्या की तो अगदी कुठल्याही क्षणाला मला उपयोगी पडेल व मला कायम आनंदी ठेवेल. अखेर एका बौद्ध भिक्षुने त्याला एक अंगठी दिली व सांगितले की यातील डबीत एका कागदावर मंत्र लिहिलेला आहे, पण जेव्हा जीवन-मरण असा प्रश्न तुझ्यापुढे उभा राहील तेव्हाच डबी उघड, तेव्हाच मंत्र कामाला येईल. बरीच वर्षे शांत गेल्यावर राजाचे दिवस फिरले. राज्यात बंडाळी झाली व त्याच्याच दुष्ट व कपटी प्रधानाने त्याला तुरुंगात टाकले. पहाटेला फाशी द्यायचे ठरले. विश्वासू सेवकाने राजाला रात्री सोडवून, एक घोडा बरोबर दिला. मजल दरमजल करीत राजा सीमेपासून दूर पळाला. हे समजल्यावर प्रधानाने सैनिकांची तुकडी राजाच्या मागावर पाठवली. राजा एका डोंगराच्या शिखरापर्यंत पोहोचला. पुढे दरी होती. घोड्याला चरायला सोडून, मोठ्या खड...